शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मीरमध्ये हिंसाचार कायम ; 23 जणांचा मृत्यू

श्रीनगर- दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये सुरु झालेला हिंसाचार कायम आहे. यात  23 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये सुमारे शंभर जवनांचा समावेश आहे.
 
तीन दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात आलं. जवानांनी आठ जुलैला अनंतनाग जिल्ह्यात बुरहानचा खात्मा केला. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं.
 
काश्मीर मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. काश्मीरमधील शोपियां, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग परिसरात आजही कर्फ्यू कायम आहे. सर्व फुटीरतावादी नेत्यांना नजरबंद करुन ठेवण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.