शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 ऑगस्ट 2016 (17:32 IST)

कुठे गेली माणुसकी? शव मुरगळून भरलं बोर्‍यात

ओडिशातील बालासोर येथे माणुसकीला लाजविणारी एक घटना समोर आली आहे, ज्यात दोन लोकांनी एका महिलेच्या शवाची दुर्गती केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार एक महिला गुरुवारी रेल्वेतून पडली, तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती केले गेले जिथे तिला मृत्यू घोषित करण्यात आले. यानंतर जे घडलं ते धक्का देणारी घटना होती.
या महिलेचा शव रुग्णालयातच दोन मजदूरांनी पिळून- मुरगळून एका बोरीत भरले आणि बांबूत बांधून घेऊन गेले. हे दृश्य पाहणार्‍यांना कापरं भरलं.
 
मृतकाची ओळख तारामणी बारीक असून ती सोरो च्या जवळपास राहणारी आहे. शवविच्छेदनासाठी तिचे शव नातेवाइकांचा सुर्पुद न केल्यानेदेखील चर्चा सुटली आहे. या पूर्ण प्रकरणात रेल्वे पोलिसावरही बोट उचलले जात आहे. 

या प्रकरणावर रेल्वे पोलिस सोरोचे एएसआय प्रताप मिश्रा यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की त्यांनी एका ऑटो रिक्षा ड्रायवरला शव रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचवण्यासाठी विचारले जिथून शव बालासोरला पाठवण्यात आले असते तर ऑटो वाल्याने साडे तीन हजार रुपये मागितले. जेव्हाकि या कामासाठी आम्ही 1000 रूपये पेक्षा अधिक खर्च करण्यात अक्षम होतो.
त्यांनी म्हटले की माझ्याकडे याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. उशीर झाल्यामुळे शव अकडून गेलं होतं म्हणून कामगारांना शव बांधण्यात त्रास होत होता. नंतर शव ट्रेनने नेण्यात आले. मृतकाच्या मुलाने दुखी मनाने म्हटले की जरा तरी माणुसकी दाखवायला हवी होती. तो पोलिसांविरुद्ध प्रकरण नोंदवण्याचा विचार करत आहे.