शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (10:10 IST)

केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर: मायावती

नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत आहे आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या राजकीय कारणासाठी छळ केला जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे. सीबीआयने कोट्यवधी रुपायांच्या घोटाळ्या प्रकरणी सुमारे चार वर्षाच्या तपासानंतर आपल्याविरुद्ध राजकीय सूड घेण्यासाठी हा खटला दाखल केला असल्याचा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे.
 
वास्तविक या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा करून मायावती यांनी सीबीआय या घोटाळ्याचा तपास करण्यास मुक्त आहे, मात्र त्याच्या धमक्यांना आपण मुळीच घाबरणार नाही व चौकशीत सहकार्य करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. सीबीआयने आपल्याविरुद्ध चौकशी करण्यासाठी जी वेळ निवडली ती आपले नीतीर्धैय खच्ची करणारी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य घोटाळ्याशी काहीच संबंध नाही, मात्र केंद्रातील भाजपचे सरकार हे सूडबुद्धीने आपल्याला त्यात गोवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याबाबत आपली संघटना नियमाप्रमाणे तपास करेल, अशी ग्वाही सीबीआयचे संचालक अमित सिन्हा यांनी दिली आहे.