शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:06 IST)

केजरी-नितीश युतीने ‘आप’चे कार्यकर्ते नाराज

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी जी युती केली आहे. त्यामुळे ‘आप’चे कार्यकर्ते भलतेच नाराज झाल्याचे ‘आप’च्या सूत्राकडून सांगण्यात आले. लवकरच होणार्‍या बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या पूर्वेकडील भागामध्ये प्रचार न करण्याचे ठरविले आहे.