शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (17:33 IST)

केजरीवालांनी भ्रष्टाचारात अडकलेले मंत्री असीम अहमद यांना बाहेर काढले

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले एक मंत्री आसिम अहमद खान यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप लागल्यानंतर लगेचच त्यांना मंत्री पदावरून बाहेर काढले आहे. आसिमवर एका बिल्डरकडून पैसे मागायचा आरोप आहे.  
 
सीएम केजरीवाल यांनी म्हटले की जर कोणी भ्रष्ट असेल तर त्यांना मी बिलकुल सोडणार नाही मग तो माझा मुलगा, मनीष सिसोदिया किंवा अजून कोणी असो. तसेच त्यांनी सांगितले की आम्ही ही केस तपासणीसाठी सीबीआयकडे पाठवत असून आसीम यांना पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय देखील घेण्यात येईल. तसेच केजरीवाल यांनी बीजेपीला मागणी केली आहे की त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या सीएम शिवराज सिंह यांना देखील पदावरून बाहेर काढायला पाहिजे.  
 
आसीम अहमद खान दिल्लीत खाद्य एवं पर्यावरण मंत्री होते आणि आता इमरान हुसेन त्यांची जागा घेतील. खान यांच्यावर 'बिल्डरांबरोबर  मिलीभगत' असल्याचे आरोप लागले होते.  
 
सीएम केजरीवाल यांनी एक ऑडियो रिकॉर्डिंग देखील सुनावली, जो खान आणि बिल्डरमधील झालेल्या किमान एक तासाच्या संवादाचा    एक भाग आहे, असे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले की, लोक आम्हाला प्रामाणिक नेता मानतात. आम्ही येथे सत्तेसाठी आलेले नाही आहोत. म्हणून आम्ही आमचे मंत्री, आमदार आणि अधिकार्‍यांना सोडणार नाही.