गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2015 (11:28 IST)

केदारनाथने दिले राहुल गांधींना बळ

केदारनाथ : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदयात्रा करुन केदारनाथाची मनोभावे पूजा करुन दर्शन घेतले. येथे मला वेगळीच शक्ती मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी मंदिरातून बाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली. 
ते रुद्रप्रयाग येथील गौरीकुंडावर हेलिकॉप्टरने पोहोचले आणि त्यांनी येथून चक्क केदारनाथची पदयात्रा सुरू केली. पत्रयात्रेतच त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता. सकाळी केदारनाथला पोहोचल्यावर भाविकांसमवेतच 
ते मंदिराकडे गेले. त्यांनी मंदिरात पूर्जा केली.