गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: तिरुवअनंतपूरम , बुधवार, 13 एप्रिल 2016 (10:24 IST)

केरळमध्ये भाजपला संधी नाही : चंडी

केरळ विधानसभा निवडणुकीत कमळ फुलेल, असा विश्वास भाजपला वाटत असला तरी मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मात्र राज्यात भाजपचा चंचूप्रवेशही होणार नल्याचे स्पष्ट केले. 
 
केरळमधील जनतेचा भगव्या पक्षाच्या तत्त्वांवर अजिबात विश्वास नसल्याचे चंडी यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत भाजप केरळमध्ये  खाते उघडेल का, या प्रश्नाला चंडी उत्तर देत होते. केरळमध्ये आतापर्यंत भाजपला एकदाही एकही आमदार अथवा खासदार निवडून आणता आलेला नाही. यंदा भाजपने केरळमध्ये भारत धर्म जनसेना या स्थानिक पक्षाशी युती केली आहे. भाजपने यंदा प्रथमच माकपच्या   नेतृत्वाखालील एलडीएफ आणि यूडीएफला आपण तिसरा पर्याय असल्याचे म्हटले आहे.