शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (13:05 IST)

कोळसा खाण वाटप फाइल बंद, बिर्लांना दिलासा

कोळसा खाण वाटपप्रकरणी उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याचा तपास थांबवत असल्याचा अहवाल विशेष कोर्टाकडे दिला आहे. यावर विशेष कोर्टचे न्यायाधीश भारत पराशर यांच्या कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी सीबीआयच्या अहवालावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बिर्ला आणि कोळसा खात्याचे माजी सचिव पी.सी.पारख यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. 'हिंदाल्कोला' कोळसा खाण नाकारण्याचा निर्णय पारख यांनी काही महिन्यातच बदलला होता. परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसताना किंवा कोणतेही वैध कारण नसताना हा निर्णय घेतल्याचा आरोप पारख यांच्यावर करण्यात आला.