शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 28 मार्च 2015 (10:39 IST)

खुशामतखोरांचा सोनियांना गराडा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षातील महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या अन्य नेत्यांवर सोपवायला तयार नसल्याची टीका माजी केंद्रीय नेते एच. आर. भारद्वाज यांनी केली. त्यांच्याभोवती खुशामत करणार्‍या आणि भ्रष्टाचारी लोकांचा गराडा पडल्याचे झणझणीत बोलसुद्धा एच. आर. भारद्वाज यांनी काँग्रेसला सुनावले आहेत.
 
त्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर काढले. टूजी प्रकरणात त्यांच्याभोवती असलेल्या काही लोकांचे म्हणणे न ऐकल्याने मला मंत्रिपदावरून दूर केले गेले. घोटाळ्यांमध्ये याच भ्रष्ट नेत्यांचा हात असल्याने काँग्रेस पक्ष लयाला गेल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.
 
आमच्या सर्वोच्च नेत्याला न्यायालयाकडून समन्स बजावले जाणे, ही आमच्यासाठी अत्यंत दु:खाची बाब आहे. मात्र, या सगळ्यात पंतप्रधानांच्या स्तरावरील व्यक्तीही गुंतल्या होत्या. सोनिया गांधी यांना या सगळ्याची जाणीव नव्हती का, हे कुणी आणि का घडवले, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना विचारला.