गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (17:27 IST)

खैरलांजी प्रकरणाला १० वर्षे पूर्णं

सवर्ण- दलित वादाला आणि संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला  10 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे प्रकरण महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात घडले होते . सवर्ण गावकरयानी मागासवर्गीय समाजातील  भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केली होती.. या घटनेने  विधानसभेसह संसदेतही ह्दारली होती. 
 
दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची  पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते. आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली. . भैयालाल भोतमांगे यांची अजूनही न्यायासाठी लढाई सुरु आहे. या आरोपीना फाशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे.
 
या हत्याकांडांनंतर उशिरा  महिन्यानंतर खटला सुरु झाला .तर यावर निर्णय देताना भंडारा न्यायालयाने   15 ऑक्टोबर 2008 साली  8 जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी आहे.