गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 28 जुलै 2014 (16:46 IST)

'गडकरींच्या हेरगिरी'ची चौकशी करा, भाजपचीही मागणी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अडचणी वाढण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. नितीन गडकरी यांच्या शासकीय बंगल्यात आढळलेल्या हेरगिरी उपकरणाची प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी लावून धरली आहे. या आधी कॉंग्रेसने चौकशीची मागणी केली होती. आता भाजपमधूनही चौकशीची मागणी केली जात असल्याचे कॉंग्रेसला बळ मिळाले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत अमेरिकेवरच संशय व्यक्त केला आहे. शिवाय हा प्रकार यूपीए सरकारच्या काळातच झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एनआयएतर्फे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.