शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गांधीनगर , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (11:38 IST)

गरबा खेळणार्‍या मुस्लिमांची 'घर वापसी'

नवरात्रौत्सवात गरबा खेळायला येणार्‍या मुस्लिम तरुणांची 'घर वापसी' करण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या गुजरात शाखेने दिला आहे. 
 
विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रणछोड भारवाड यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले, गुजरात राज्यात नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यासाठी येणार्‍या मुस्लिमांची घर वापसी करण्यात येणार आहे. 
 
मंडपात दाखल होताच त्यांच्यावर गोमूत्र शिंपडून, गंगाजल प्राशन करायला लावून त्यांना हिंदू बनविण्यात येईल. गरबास्थळी येणारा मुस्लिम तरुण हिंदू बनण्यासाठीच आला असल्याचे मानून त्याच्या घर वापसीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा भारवाड यांनी केली आहे.