बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:43 IST)

गुजरात म़ॉडेल फसवे, प्राचार्याचा विद्यार्थ्यांना ई-मेल

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे 'गुजरात मॉडेल' फसवे असल्याचे मुंबईतील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी म्हटले आहे. देशातील मतदारांनी योग्य उमेदवार निवडावा, असा सल्लाही प्राचार्य महोदयांनी दिला आहे. विशेष म्हणजे प्राचार्य महोदयांनी  वरील आशयाचा इ-मेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य फादर फ्रेजर मॅस्करेनथस यांनी 'गुजरात मॉडेल' फसवे असल्याचे म्हटले आहे. फादर फ्रेजर मॅस्करेनथस यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राचार्य फादर फ्रेजर मॅस्करेनथस यांनी आपले मत महाविद्यालयाच्या संकेतस्थळवरही अपलोड केले आहे. भांडवलशाही आणि सांप्रदायिक शक्ती प्रभावशाली ठरत असल्याचे देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी हे घातक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.