बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गांधीनगर , शनिवार, 30 जुलै 2016 (17:38 IST)

गुजरातमध्ये टोलमुक्ती

छोट्या खासगी वाहनांना गुजरातमध्ये टोलमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल सरकरानं केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

भाजपची सत्ता असलेल्या आपल्या शेजारील गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. त्यामुळे एरव्ही प्रत्येक गोष्टीत गुजरातच्या पावलावर पाऊल ठेवणारे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात टोलमुक्ती कधी घोषित करणार हा प्रश्न आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो. फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 12 टोलनाके कायमचे बंद आणि 53 टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलसूट मिळालेली नाही. गुजरातने छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्ती दिली असताना, महाराष्ट्रात हा निर्णय कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.