शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

गुन्हेगार शासकीय नोकरीसाठी अपात्र!

गुन्हेगारीचा आरोप असलेल्या व्यक्तीची आरोपातून मुक्तता होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला शासकीय नोकरीसाठी पात्र समजले जाऊ शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. एस.के. नाझरूल इस्लाम याची कॉन्स्टेबल पदावरील नियुक्त रद्दबाबत ठरवताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

नाझरूल इस्लाम याची कॉन्स्टेबलपदी नियुक्ती करण्याची ज्या अधिकार्‍यांवर जबाबदारी होती, त्यांनी नाझरूल इस्लाम या नियुक्ती करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही, तसेच त्याचा पूर्वेतिहास याची खातरजमा करून घेणे गरजेचे होते, असे मत कोर्टाने व्यक्त केले. नाझरूल पूर्वी 2007मध्ये भरती झाला होता. मात्र नंतर पडताळणीत तो जामिनावर बाहेर असल्याचे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते.