गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रांची , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:42 IST)

गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर नक्षली भागात भरकटले

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर झारखंडमधील नक्षली भागात भरकटल्याची घटना घडली. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजनाथ प्रचारासाठी आले असता ही घटना घडली. एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी)सिग्नल न दिल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री राजनाथ यांचे हेलिकॉप्टर नक्षल प्रभावित भागात जवळपास आठ मिनिटे घिरटया घेत होते. 
 
वैमानिकाने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर एक सुरक्षित स्थळी उतरवले आणि नंतर तेथून रांची एअरपोर्टवर नेले. यामुळे राजनाथ सिंह यांची एक प्रस्तावित जाहीर सभा ऐनवेळी रद्द करण्‍यात आली. 
 
सिंहभूम जिल्ह्यातील बडाजामदा येथे सभेत संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरला जवळपास 8 मिनिटे एटीसीने कोणताही सिग्नल दिला नाही. वैमानिकाने एटीसीला संपर्क साधन्याचा खूप प्रयत्न केला. अखेर त्याने रांची एअरपोर्टला अलर्ट दिल्याचे अधिकार्‍यांची चांगलीच धांडली उडाली.