बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

चिदंबरम यांच्‍यावरही बूट

केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्‍यावर कॉंग्रेसच्‍या पत्रकार परिषदे दरम्‍यान दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्राच्‍या प्रतिनिधीने बूट फेकल्‍याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजेच्‍या सुमारास घडली. जनरैल सिंह‍ नावाच्‍या या पत्रकारास लगेच अटक करण्‍यात आली आहे.

पक्षाच्‍या पत्रकार परिषदेत चिदंबरम बोलत असताना शिख समुदायाच्‍या या पत्रकाराने जगदीश टायटलर यांना 1984 च्‍या दंग्यात क्लिनचीट दिल्‍याच्‍या निषेधार्थ बूट भिरकावला आहे. जनरैल सिंह यांनी या संदर्भात चिदंबरम यांना प्रश्‍न विचारला असता तो चिदंबरम यांनी टाळला होता.

दरम्‍यान, जनरैल सिंह यांनी आपण केलेल्‍या प्रकाराबाबत दुःख व्‍यक्त केले आहे. आपण टायटलर यांना क्लिनचीट का दिली या संदर्भात प्रश्‍न विचारला असता चिदंबरम यांनी न्‍यायालयाचा निर्णय सर्वांना मान्‍य करावा करावा लागेल असे उत्तर दिले त्‍याने समाधान न झालेल्‍या जनरैल सिंह यांनी चिदंबरम यांच्‍यावर बूट भिरकावला. असे असले तरीही शिख बांधवांनी संयम बाळगावा. माझी प्रतिक्रिया ही तत्काळ उमटलेली प्रतिक्रिया होती. मला हिरो व्‍हायचे नव्‍हते. मात्र माझा मुद्दा खरा होता तो मांडण्‍याची पध्‍दत चुकली हे मला मान्‍य. मी माफी मागणार नाही असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.