गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 23 मार्च 2013 (12:47 IST)

चीनचा मैत्रिचा हात, भारताची सावध भूमिका

FILE
चीनने दोन देशांदरम्यान सीमेवर गैरसमज किंवा चिथावणीचे वातावरण निर्माट होऊ नये म्हणून सीमा संरक्षण सहयोग करार करण्यासाठी हात पुढे केला आहे, मात्र भारताने सद्या हात आखडता घेऊन प्रस्तावाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

दोन देशांदरम्यान राजधानीत शुक्रवारी सचिव स्तरावरील चर्चेदरम्यान यावर्षी चीनमध्ये लष्करी स्तरावर दहशतवादविरोधी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. या संयुक्त अभ्यासाची तारीख नंतर निश्चित होईल.

वास्तविक नियंत्रण रेषेवर गस्ती दरम्यान नजरेस पडल्यास दोन्ही देशांचे सैनिक एकदुसर्‍यांचा पाठलाग करणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. दोन्ही देशांचे सैनिक कोणत्याही परिस्थितीत एकदुसर्‍यांवर गोळीबार करणार नाही, असेही त्यात म्हटले आहे. (भाषा)