शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (11:06 IST)

चोरीला गेलेली ‘दुर्गामाता’ जर्मनीकडून परत

काश्मीरमधील एका मंदिरातून २० वर्षांपूर्वी चोरी गेलेली दहाव्या शतकातील दुर्गा मातेची मूर्ती जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्त केली.
 
महिषासुरमर्दिनी अवतारातील दुगार्मातेची ही मूर्ती १९९० मध्ये काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका मंदिरातून चोरीला गेली होती.
 
त्यानंतर २०१२ मध्ये ही मूर्ती स्टुटगार्त येथील लिंडन संग्रहालयात दिसल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळविण्यात आले होते.
 
तेव्हापासूनच भारत सरकारने ही मूर्ती परत मिळविण्याचा प्रयत्न चालविलेला होता. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या दोन अधिकार्‍यांनी गेल्या वर्षी स्टुटगार्तला भेटही दिली होती. दरम्यान, मूर्ती परत केल्याबद्दल मोदी यांनी मर्केल आणि जर्मनीचे यांचे आभार व्यक्त केले.