शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 (19:29 IST)

जन-धन योजनेत सहा महिन्यांत साडे सात कोटी खाते उघडणार

भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे बॅंक खाते असावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन-धन योजनेचे उद्घाटन केले. देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सेवांनी जोडण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्यासाठी जन-धन योजना फायदेशीर होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, देशातून गरीबी संपवायची असेल तर, प्रथम देशातील आर्थिक अस्पृष्यता संपवावी लागेल. त्याची सुरवात या योजनेच्या माध्यमातून होत आहे. कोणीही बँक खाते उघडले तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा होण्याच्या प्रक्रियेतील त्याचे ते पहिले पाऊल आहे.ग्रामीण भागातील महिला महत् प्रयासाने पैशांची बचत करतात. मात्र, घरातील पुरुष जर व्यसनी असेल तर तिला ते पैसे लपवून ठेवावे लागतात. जन - धन योजना अशा महिलांना बँक खाते आणि आर्थिक शक्ती देईल. योजनेमुळे गरीबांना गरीबीशी लढण्याची शक्ती मिळेल. ही संपूर्ण योजना गरीबी मिटविण्यासाठी उपयोगी ठरेल.26 जानेवारी 15 पर्यंत खाते उघडे तर, एक लाख रुपयांच्या विम्यासह 30 हजारांचा अतिरिक्त विमा देखील मिळणार असल्याचे मोदींनी सांगितले.

दरम्यान, देशातील राष्ट्रीयकृत बँकानी गुरुवार पासून 60 हजार कँप लावले होते. ही योजना देशातील 600 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे. देशातील 20 मुख्यमंत्री विविध ठिकाणी या योजनेच्या शुभारंभासाठी उपस्थित होते.