गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (10:31 IST)

जर्मनीकडून भारताला एक अब्ज युरोची सौर ऊर्जा

सौर ऊर्जेसाठी भारताला एक अब्ज युरोचा निधी देण्याची घोषणा जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी केली. भारत दौर्‍यावर  आलेल्या मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होऊन १८ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.
 
या सामंजस्य करारांमध्ये जर्मनी कंपन्यांना वेगाने मंजुरी देण्याचाही करार असून संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर माहिती, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील संबंध विस्तारित करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. दहशतवादाच्या धोक्याशी एकत्रितपणे लढण्याचा निर्धारही दोन्ही देशांनी व्यक्त केला आहे. व्यक्त केला.
 
मर्केल आणि मोदी यांच्यादरम्यान नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पार पडलेल्या चचेर्नंतर या सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. जर्मन भाषेला भारतात आणि आधुनिक भारतीय भाषांना जर्मनीत प्रोत्साहन देण्यासाठीही करार करण्यात आला.