गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (10:08 IST)

जल वाहतुकीत क्रांतिकारी बदल

देशातील जल वाहतुकीच्या   विकासासाठी पुढील काळात क्रांतिकारी बदल करणार असल्याचे जाहीर करत ‘जेएनपीटी’ 4 हजार कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.  मंत्रिपदी विराजमान झाल्यापासून 100 दिवसांच्या   काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करताना ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या 100 दिवसांमध्ये वादात अडकलेले जवळपास 24 प्रकल्प पुन्हा सुरू केले असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ससून डॉकच आधुनिकीकरणाचा प्रकल्प सुरू करणत आला असून मुंबईतील बंदराच्या   विकासासाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आल्याचेही   गडकरी म्हणाले. देशातील रस्ते, महामार्गाच्या  विकासाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, ‘जगात सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे असणार्‍या यादीत भारत दुसर्‍या स्थानी आहे. दिवसाला 30 किमी रस्ता विकासाचे आमचे ध्येय आहे.

या विभागाचा मी पदभार स्वीकारला तेव्हा 189 रस्ते प्रकल्प परवाने, जमीन अधिग्रहण अशा विविध वादामध्ये अडकले होते. ते मार्गी लावण्यात आले. रस्ते वाहतूक   मंत्रालयातर्फे दोन वर्षामध्ये 2 टक्के जीडीपीचे योगदान आमचा मानस आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत दर्जेदार आणि इको-फ्रेंडली रस्त्याची निर्मिती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते पुढे म्हणाले.