मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शाहजहांपुर , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (11:34 IST)

जसे मक्का मदीनेत मंदिर नाही, तसेच अयोध्यात मशीद नाही :योगी आदित्यनाथ

अयोध्या राम मंदिर प्रकरणात भाजपा नेता योगी आदित्‍यनाथ यांच्या एका संवेदनशील विधानामुळे परत वाद सुरू झाला आहे. गोरखपुराहून संसद योगी आदित्‍यनाथ यांनी अयोध्येत एकाच वेळेस मंदिर आणि मशीदीच्या निर्माणाच्या प्रस्तावाला साफ नकार दिया आहे. त्यांनी म्हटले की ज्याप्रकारे मक्केत मंदिर बनू शकत नाही, वेटिकन सिटीमध्ये देखील मंदिराचा निर्माण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे अयोध्येत देखील मशीदीचे निर्माण होऊ शकत नाही.  
 
आदित्‍यनाथ यांनी हे विधान शाहजहांपुरच्या एसएस कॉलेजमध्ये आयोजित संत संमेलनात आपल्या भाषणात केले. आदित्‍यनाथ यांनी म्हटले की कोर्टाने देखील मानले आहे की अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे आणि येथे राम मंदिराचे निर्माण झाले पाहिजे आणि हे नक्कीच होईल. त्यांनी म्हटले ज्याप्रकारे आम्ही मक्‍का आणि वेटिकन सिटीमध्ये मंदिर बनवण्याची कल्पना देखील करू शकत नाही मग अयोध्येत मशीदीचे निर्माण का?  
 
बाबरी मशीद घोटाळ्याचे मुख्य फिर्यादी हाशिम अंसारी आणि अखाडाचे महंत ज्ञानदास यांचे मंदिर आणि मशीद बनवण्याच्या प्रस्तावाला   रद्द करण्यात आले आहे. आदित्‍यनाथने सांगितले की अयोध्या सनातन धर्माची भूमी असून येथे श्रीरामाचा जन्म झाला होता. म्हणून येथे फक्त मंदिराचे निर्माण व्हायला पाहिजे.