शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 23 मे 2015 (11:38 IST)

जिंदाल, कोडांसह 9 जणांना जामीन

काँग्रेसचे नेते व उद्योजक नवीन जिंदाल, कोळसा खात्याचे माजी राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि इतर सातजणांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
 
कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर खटला चालू आहे. जिंदाल, रावा, कोडा, कोळसा विभागाचे माजी सचिव हरिशचंद्र गुप्ता आणि इतर लोक आरोपी म्हणून विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांच्यासमोर हजर होऊन स्वतंत्र याचिका दाखल केली. जिंदाल यांच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीआयने जेव्हा बोलावले तेव्हा त्यांच्या अशिलाने (जिंदाल) तपासामध्ये सहकार्य केले. त्यामुळे ते ङ्खरार होतील किंवा न्यायप्रक्रियेपासून दूर जातील अशी शक्यता नाही. त्याचप्रमाणे इतर आरोपींच्या वकिलाने सांगितले की, त्यापैकी कोणालाही तपासादरम्यान अटक करण्यात आली नव्हती, आणि ते ङ्खरार होण्याची शक्यता नाही.