गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीहरीकोटा , शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (10:56 IST)

जीपीएस उपग्रह झेपावला; क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पुर्ण

इस्त्रोने आयआरएसएसएस-१ जी मालिकेतील सातव्या  दिशादर्शक उपग्रहाचे  यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपक अवकाशात झेपावल्यानंतर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडला गेला. त्यामुळे भारताला अमेरिकेच्या जीपीएस या स्थितीदर्शक यंत्रणेच्या तोडीची सेवा देणे शक्य होणार आहे.

 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात दिशादर्शक उपग्रहांच्याप्रक्षेपणाची योजना आखली असून आयआरएसएसएस-१ जी हा या मालिकेतील शेवटचा उपग्रह आहे.आयआरएसएसएस-१ जी मालिकेतील या अंतिम दिशादर्शक उपग्रहामुळे भारताने क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पुर्ण केली आहे. यामुळे भारताला आता  इतर देशाच्या सॅटलाईवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम असणाऱ्या ५ देशामध्ये भारताचा समावेश झाला आहे.