गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:51 IST)

जीसॅट 6 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

मुंबई- भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) जीसॅट 6 या उपग्रहाचे सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह म्हणून जीसॅट- 6 कडे पाहिले जात होते. जीसॅट मालिकेतील हा बारावा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ नऊ वर्षे आहे. एस बँड व सी बँड वापरकरत्यांना या उपग्रहाच्या सेवेचा लाभ होणार आहे. या उपग्रहाचे वजन 2117 किलो असून त्यात 1132 किलो इंधने व 985 किलो वजनाच्या मूळ उपग्रहाचा समावेश आहे. या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास सहा मीटर आहे. काल 11.52 वाजता या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती सुरू झाली होती.
 


 
विशेष:
 
* क्रायोजेनिक इंजिनाचा तिसर्‍यांदा वापर.
 
* लष्करी कार्यासाठी उपयोग होणार.
 
* जीएसएलव्ही-डी 6 चे वजन 2117 किलो.
 
* भारताचा सर्वात मोठा कम्युनिकेशन सॅटेलाईट.
 
* इस्त्रोच्या 25 वी दळणवळण सॅटेलाईट.