शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (12:57 IST)

जैन मुनींवर वादग्रस्त ट्विट केल्याने केस दर्ज

ट्विटर द्वारे जैन मुनिवर टिप्पणी केल्यानंतर प्रसिद्ध सिंगर आणि म्युझिशियन विशाल ददलानी अडचणीत आल्यामुळे गायक विशालने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.   
 
तसेच, जैन समाजाच्या एका सदस्याने दिल्लीच्या शाहदरा ठाण्यात ददलानी आणि पूनावाला यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. व्यक्तीने ददलानी आणि पूनावालावर जैन मुनी तरुण सागर यांच्या अपमान केल्याचा आरोप लावला आहे.    
 
याचे एलान विशाल यांनी आपल्या ट्विटर वॉलवर केले आहे. त्यांनी काल रात्री ट्विट केले की मला फार वाईट वाटत आहे की माझ्या टिप्पणीमुळे माझे जैन मित्र, माझे मित्र अरविंद केजरीवाल आणि सतेंद्र जैन यांना ठेस पोहोचली आहे. मी सक्रिय राजकारणातून स्वत:ला वेगळे करतो.  
 
महत्त्वाचे म्हणजे जैन मुनी तरुण सागरजी यांनी मागील दिवसांमध्ये हरियाणा विधानसभेत विधायकांना प्रवचन दिले होते. आपल्या प्रवचनात त्यांनी राजनीतिज्ञांना आपल्या आचरणात सुधार आणण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या प्रवचनानंतर ददलानीने ट्विटरवर त्यांच्या विरोधात आपत्तीजनक टिप्पणी केल्याने वाद अधिकच वाढला.   
 
तरुण सागर जी महाराज बगैर कपड्यांचे राहतात आणि ददलानीने ट्विटरवर त्यांच्या या वेष-भूषेवर टिप्पणी केली. ददलानीची टिप्पणी नंतर त्यांच्या विरोधात लोकांनी ट्विटरवर मोर्चा काढला आहे.