शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By एएनआय|

टाळी एकाच हातानेसुद्धा वाजते!

टाळी दोन हाताने वाजते हे आपणास माहीत आहे मात्र ती एक हातानेही वाजू शकते यावर विश्वास बसेल काय? लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने एका हाताने टाळी वाजवण्याचे एकमेवाद्वितीय कौशल्य विकसित केले आहे.

येथील जी एफ कॉलेजचा कला शाखेचा विद्यार्थी रझा हुसेन याने दोन्ही हाताची मनगटे हवी तशी वळवून बोटे हातावर आदळून टाळीसारखा आवाज काढण्याचे कौशल्य विकसित केले आहे.

या आपल्या अनोख्या क्षमतेची दखल गिनिज बुक ऑफ वल्ड्स रेकॉड्सने घ्यावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्याने सहा वर्ष सराव केला.

यासाठी त्याचे मनगट किंवा हातास विशेष ताण पडत नाही. हे कला किंवा कौशल्य सर्वदूर पोहचवण्याची मनीषा व्यक्त करतानाच इतर दोन हातांनी टाळी वाजवतात मात्र एक हाताने टाळी वाजवण्याचे कौशल्य अनोखेच असल्याचे त्याने स्पष्ट केले.