शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 मे 2015 (16:44 IST)

'टोलधाड' थांबणार नाही : गडकरींची स्पष्टोक्ती

चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यु टर्न घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
 
विधानसभा आणि त्यापूर्र्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी टोलचा मुद्दा ऐरणीवर होता. नेमका हाच धागा पकडून भाजपाने आघाडी सरकारची कोंडी करुन प्रचार केला होता. सत्तेवर आल्यास टोमुक्ती करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, आश्वासन देणार्‍या या भाजपा सरकारने आता सोयिस्कररित्या यु-टर्न घेतला आहे.
 
चांगले रस्ते हवे असतील तर तर त्याची किंमत मोजावीच लागेल त्यामुळे सरसकट टोमुक्ती करणे शक्य नाही, असे गडकरी एका खासगी कार्यक्रमात बोलताना म्हणाले. दरम्यान, त्यांच्या याच मुद्यांवर काँग्रेसने टीका केली असून आश्वासन न पाळता भाजपाने देशाची फसवणूक केली असल्याची टीका करण्यात येत आहे.