गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: लखनौ , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (14:47 IST)

'ताज महालाचा ताबा वक्‍फ मंडळाकडे द्यावा'

नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ उडवून देणारे समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ताज महालाचा ताबा वक्फ मंडळाकडे द्याया, अशी नवी मागणी आझम खान यांनी केली आहे. आझम खान हे समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील अल्पसंख्यांक आणि वक्‍फ बोर्डाचे मंत्री आहेत. 
 
आझम खान म्हणाले, ताज महालामध्ये दोन मुस्लिमांची कबर असल्याने ही वास्तू सुन्नी वक्‍फ बोर्डाकडे हस्तांतरित करावी". 
 
ताज महाल पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येत असतात. यातून मिळणारे उत्पन्न देशातील मागासवर्गीय मुस्लिमांच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावे, अशी भूमिकाही आझम खान यांनी मांडली. कुठलीही कबर केंद्रीय वक्‍फ मंडळाच्या अखत्यारीत असते. ताज महालामध्ये शाहजहान आणि मुमताज महल यांची कबर आहे. एखादी वास्तू पडक्‍या स्वरूपात असेल, तर तिला वक्‍फ मंडळाची मालमत्ता समजली जाते. पण त्यातून उत्पन्न मिळणार असेल, ती वास्तू महागडी असेल तर ती भारत सरकारची मालमत्ता होते. ताज महालातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर मुस्लिमांच्या शिक्षणासाठी करता येईल. यातून वक्‍फ मंडळ किमान दोन विद्यापीठे चालू शकतील असेही आझम खान यांनी म्हटले आहे
 
दुसरीकडे, दिल्ली वक्‍फ मंडळाचे अध्यक्ष चौधरी मतीन अहमद यांनीही आझम खान यांच्यावर टीकास्त्र सोडले. भारतीय पुरातत्व खाते ताज महालाची अधिक चांगल्या पद्धतीने देखभाल करू असल्याचेही अहमद यांनी म्हटले आहे. तसेच ताज महालावरून राजकारण करू नये, असे भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.