गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:14 IST)

तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी पाच सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद  ऐकल्यावर पोलीस कोठडी वाढविण्याचा निर्णय दिला. 
 
इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. भारतीय दंडविधान संहितेचे कलम 328 नुसार विष पाजून मृत्यूस कारणीभूत ठरणे हा गुन्हाही पोलिसांनी तिघांविरोधात नोंदविला आहे. त्याचबरोबर खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हाही नोंदविणत आला आहे. आम्हाला संजीव खन्ना यांचा पासपोर्टही जप्त करायचा आहे. अत्यंत थंड डोक्याने लेले हे कृत्य आहे. हत्येसाठी  वापरलेली गाडी जप्त करायची आहे. त्याचबरोबर रागडमध्येही तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. 
 
पोलिसांनी इंद्राणीच थोबाडीत मारले?
शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपल्याला पोलीस कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार मुंबईचे पोलीस आयुक्त  राकेश मारिा यांच्याकडे केली आहे. स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी व आयएनएक्स मीडिाची सीईओ इंद्राणी मुखर्जी हिला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर खास पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तिथे चौकशीदरम्यान तिला मारहाण करण्यात येत आहे. तिच्या थोबाडीत मारल्याने चेहर्‍यावरही सूज आली आहे. गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांकडून तिच्यावर  बळाचा वापर केला जात आहे, असे इंद्राणीच्या वकिलांनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.