शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तिरूपती देवस्थान 7.5 टन सोने बँकेत ठेवणार

तिरूपती- भारतातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तिरूपती बालाजी मंदिर संस्थान आपल्याकडील जवळपास 7.5 टन सोने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वर्ण मौद्रीकरण योजनेमध्ये देण्याची शक्यता आहे. ही योजना पंतप्रधानांनी मागील वर्षी सुरू केली होती.
 
तिरूपती तिरूमला देवस्थानमने आतापर्यंत या योजनेत 1.3 टन सोने पंजाब नॅशनल बँकेत जमा केले आहे. देवस्थानकडे आतापर्यंत 7.5 टन सोने जमा झाल्याचे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डी. संबाशिव राव यांनी हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान म्हटले.
 
स्वर्ण मौद्रीकरण योजनेतील सध्याच्या नियमात थोडे बदल करण्याची विनंती देवस्थानने सरकारला केली आहे. जमा केलेल्या सोन्यावरील व्याजाचा परतावा आपल्याला रोख न देता सोन्यातच द्यावा, अशी विनंती देवस्थानने सरकारला केली आहे.