गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (14:17 IST)

तुमचे जीवन फार अमूल्य आहे Modi Live News

- बिहारमध्ये २००५ साली १०१ हेल्थ सेंटर्स होती, मात्र २०१५ सालमध्ये त्यात घट होऊन ती ७० झाली. यावरून बिहार सरकारला लोकांच्या आरोग्याची, प्रकृतीची किती काळजी आहे ते दिसून येतं - मोदींचा टोला.
- सत्तेच्या नशेत बुडालेली लोकं बिहारमधील अभ्यासूू मतदारांना मूर्ख बनवू शकत नाही - मोदी
- बिहार सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्नच - मोदी
- केंद्र व राज्यामध्ये विकासाची स्पर्धा व्हावी असे मला वाटते, पण अजूनही काही जण जनतेला धोका देतात - मोदी
- गेली २५ वर्ष ज्यांनी जातीयवादाचे विष पसरवले त्यांनाही माझ्यामुळे पॅकेज आणावे लागले - मोदी
- बिहारच्या निवडणुकीत विकास हाच मुद्दा असायला हवा - मोदी
- आम्ही जाहीर केलेल्या पॅकेजची विरोध केला, त्याची खिल्ली उडवली - मोदी
- परदेशातील कार्यक्रमात तरुण मोदी मोदी असा गजर करतात, पण आता ही लोकंही माझ्याच नावाचा गजर करतात - मोदींंचा विरोधकांना टोला
- स्वाभिमान रॅलीत प्रत्येकजण फक्त मोदींवर टीका करत होता - मोदींचा टोला
- महाआघाडीच्या रॅलीत बिहारच्या भविष्यावर भाष्य होईल असे वाटले होते, पण या सभेतून फक्त निराशाच हाती आली, या सभेत बिहारला पुढे नेण्यावर कोणतीच चर्चा झाली नाही - मोदी
- महापुरुषांना तिलांजली देणा-यांना आता जनतेनेच तिलांजली द्यावी - मोदी
- महाआघाडीची स्वाभिमान रॅली ही राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण या महान पुरुषांना तिलांजली देणारी सभा होती - मोदी
- जी लोकं जयप्रकाश नारायण यांचे बोट धरुन राजकारणात आले त्यांनी आता जयप्रकाश नारायण यांना तिलांजली दिली आहे - मोदी
- तुमची नेमकी विचारधारा काय - मोदींचा महाआघाडीच्या नेत्यांना प्रश्न
- राममनोहर लोहिया व त्यांचे समर्थक आयुष्यभर काँग्रेसविरोधात लढत राहिले, देशाला वाचवण्यासाठी तुरुंगात जाऊन सत्याग्रह केला, पण आता त्यांचेच चेले सत्तेच्या लालसेपोटी लोहियांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्याच सोबत बसले होते - मोदी
- जे आत्ताच आश्वासन पाळत नाही ते पुढे काय करतील - मोदी
- २०१५ मध्ये वीज नाही दिली तर मी मत मागायला येणार नाही असं आश्वासन बिहारमधील विद्यमान सत्ताधा-यांनी केला होता, पण तुम्हाला वीज मिळाली का ? - मोदींचा बिहारमधील जनतेला सवाल
- बिहारमध्ये सत्तेवर बसलेली मंडळी त्यांच्या कामाचा व त्यांच्या कारनाम्यांचा हिशोब द्यायला तयार नाही - मोदी
- स्वत: हिशोब देत नाही पण माझ्याकडे हिशोब मागतात, माझ्याकडे लोकसभा निवडणुकीत हिशोब मागितला पाहिजे - मोदी
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी पुन्हा मत मागायला तुमच्याकडे येईन, त्यावेळी मी पाच वर्षात काय काय केले याच हिशोब तुम्हाला देईन - मोदी
- बिहारवर २५ वर्ष राज्य करणा-यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यायला हवा - मोदी
- कितीही राजकीय पक्ष एकत्र यावेत, कितीही खोटा प्रचार करावा पण आता बिहारची जनता विकासासाठीच मतदान करतील - मोदी
- सभेतील गर्दीवरुन बिहारी जनतेचा कल काय आहे हे दिसते - मोदी
- बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात.