शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (12:37 IST)

तुमच्या जवळ विमा पॉलिसी आहे, तर महत्वाच्या सूचना ...

भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)ने आपल्या एजंटपासून नाशुख ग्राहकांना मोठी सुविधा देऊन मोबाइल पोर्टिबिलिटीच्या आधारावर आज ‘एजंट पोर्टिबिलिटी’ सेवा सुरू केली आहे ज्यात पॉलिसीधारक आता आपला एजंट बदलू शकतील.  
 
कंपनीचे वरिष्ठ डिविजनल प्रबंधक (ठाणे डिविजन) पुनीत कुमार यांना येथे एक प्रेस वार्तेत सांगितले की जर ग्राहकांना एजंट द्वारा देण्यात आलेल्या सेवांपासून कुठली समस्या असेल तर त्यांना एजंट बदलण्याचा विकल्प देण्यात आला आहे.   
 
त्यांनी सांगितले की एजंट बदलण्याची प्रक्रिया फारच सोपी ठेवण्यात आली आहे. यामुळे विमा लॅप्स होण्याचे प्रकरण आता कमी बघायला मिळतील. श्री कुमार यांनी सांगितले की मागील वर्षात डिविजनमध्ये विमेची एकूण संख्या 270656 वाढली आणि पहिल्या प्रिमियमची राशी मागच्या वर्षात 445 कोटी रुपये होती.   (वार्ता)