मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:05 IST)

दहशतवाद्यांकडून सरपंच व मुलाची हत्या

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नुंबरदार गावचे सरपंच व त्यांच्या मुलाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 21) रात्री साडेनऊला ही घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुंबरदार गावचे सरपंच गुलाम नबी मीर यांच्या घरावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये सरपंच गुलाम नबी मीर यांच्यासह त्याचा मुलगा फिरदोस अहमद मीर(24) यांचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी दहशतवाद्यांनी याच गावात राहणारा मोहम्मद अन्वर शेख यांच्यावरही गोळ्या झाडल्या होत्या. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीरमधील गावातील सरपंचांना टार्गेट केल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात गुलझारपोरा (अवंतीपुरा) गावचे सरपंच अमिन पंडित यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.