शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2015 (09:47 IST)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनात 38 मृत्यू

सिलिगुडी- पश्चिम बंगाल राज्यामधील दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे किमान 38 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
 
राज्यातील दार्जिलिंग, कालिंपोंग आणि कुर्सेओंग या भागामध्ये किमान 25 ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरडी कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 10 व राष्ट्रीय महामार्ग 55 या रस्त्यांचे अतीव नुकसान झाले आहे. दरडी कोसळून हे रस्ते बंद पडल्याने दार्जिलिंग व सिक्कीमचा संपर्क तुटला आहे.
 
घटनास्थळी तातडीने मदत पथके पाठविण्यात आली असून मदतकार्य सुरू झाले आहे. याचबरोबर, कालिंपोंग भागामध्ये 12 नागरिक बेपत्ता असल्याचेही निष्पन्न झाले आहे.