शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 एप्रिल 2014 (17:33 IST)

दिल्ली उच्च न्यायाधिशपदी प्रथमच महिला

दिल्ली हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून रोहिणी गोर्ला यांनी‍ आज (सोमवारी) सूत्रे स्विकारली. रोहिणी गोर्ला यापूर्वी आंध्रप्रदेश हायकोर्टात उच्च न्यायाधीश होत्या.

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी रोहिणी गोर्ला यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. दिल्ली हायकोर्टाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच कोर्टाला महिला न्यायाधीश मिळाल्या आहेत. यापूर्वी एव्ही रामाण्णा हे उच्च न्यायाधीश होते. गेल्या फ्रेब्रुवारीत रामाण्णा यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून ‍नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.