गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नई दिल्ली , शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (13:53 IST)

दिल्लीत लंगुरांच्या वेषात माकड पळवत आहे युवक

वानरांना पळवण्यासाठी लंगूर (मोठा वानर) आणण्याची बाब तर सर्वांनाच माहीत आहे, पण लंगुराची कमी असल्याने यांच्या जागेवर माणसांना तयार करण्यात येत आहे. स्वत: केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले की नवी दिल्ली नगर पालिका परिषद (एनडीएमसी)ने 40 असे युवकांना नियुक्त केले आहे, जे लंगूरच्या वेशभूषेत राहतात, आणि त्यांना बघताच बंदर पळून जातात.  
 
प्रशासनाला ही योजना यासाठी आखावी लागली कारण नवी दिल्ली भागात जादा प्रमाणात माकड आहे. शास्त्री भवन, उद्योग भवन आणि  निर्माण भवनाच्या सरकारी आणि मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये यांच्यापासून बचाव करण्यासाठी खिडक्यांवर लोखंड्याच्या मजबूत जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर ही बंदरांचा गोंधळ इतका असतो की त्याने एसी आणि कूलर नेहमी तुटत राहतात. 
 
सरकारने सांगितले की संसद भवन परिसरात आणि जवळपास माकड आणि कुत्र्यांची समस्यांपासून सुटकारा करण्यासाठी बरेच काम करण्यात येत आहे. शहरी विकास मंत्री एम वेंकैया नायडूने आज राज्यसभेत सांगितले की कुत्र्यांना पकडणारा दल, आवारा कुत्र्यांना पकडण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा संसद भवन आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात जातात, जेथे कुत्र्यांचे लसीकरण आणि वन्ध्याकरण नाही केले गेले आहेत.  
 
लंगूर प्रमाणे माकडांना पळवण्याचे काम करणार्‍या प्रमोदने सांगितले की या कामासाठी त्यांना 7500 रुपये दिले जातात, आणि त्यांच्या ड्यूटीची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असते. सर्वात आधी माकडांची संख्या आणि ते किती खतरनाक आहे, याचा अंदाजा घ्यावा लागतो.