गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (10:40 IST)

दिशाभूल केलने मोदींनी माफी मागावी : खर्गे

गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा परत आणण्याबाबत जे आश्वासन दिले होते, ते संपूर्ण फसले असल्याबद्दल मोदी सरकारने देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी लोकसभेमध्ये काळ्या काळ पैशावरील चर्चेचा प्रारंभ करताना केली आहे. मोदी सरकारने आपल्या राजकीय फायद्यासाठी काळा पैसा परत आणण्याबाबत दिलेले आश्वासन स्पेशल फसले असल्याबद्दल खर्गे यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
 
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये एकदा का विदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणला तर येथील भारतीयांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये मिळतील, हे मोदी सरकारने आश्वासन साफ फसले असल्याबद्दल खर्गे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसामध्ये आम्ही काळा पैसा परत आणू हे मोदी यांचे आश्वासन खोटे ठरल्याबद्दल खर्गे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आणि याबद्दल त्यांना देशातील जनतेला जाब द्यावा लागेल, असे बजावले आहे. काळा पैसा विदेशी बँकांमध्ये ठेवणार्‍यांची यादी आपले सरकार लवकरच जाहीर करील, असे मोदी यांनी सांगितले होते. पण ते त्यांनी पाळले नाही आणि देशामधील जनतेची दिशाभूल केली, अशी घणाघाती टीका खर्गे यांनी केली आहे.