मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (14:40 IST)

देशातील मुस्लिमांनी मोदींना निवडले नाही ...

जामा मशीदचे इमाम सैयद अहमद बुखारी यांच्या नजरेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफाचे जास्त महत्त्व आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या दस्तारबंदी विधीत मध्ये शरीफ यांना निमंत्रण पाठवले आहे, पण मोदींना त्यांनी त्या योग्य समजले देखील नाही.  
 
बुखारी यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हटले की हे मी नक्की करीन की मी कोणाला बोलवायला पाहिजे आणि कोणाला नाही. त्यांनी म्हटले की देशातील मुस्लिमांची इच्छा नाही आहे की मोदींनी कार्यक्रमात यावे. मुसलमान त्यांना आपले समजत नाही. मोदी फक्त एका दर्जाची गोष्ट करतात, त्यांनी संपूर्ण देशाच्या जनतेसाठी बोलायला पाहिजे. त्यांना मुसलमानांच्या समीप यायला पाहिजे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की मुसलमानांनीही मोदींना देशाचे पंतप्रधानम्हणून निवडून आणले आहे तेव्हा बुखारी म्हणाले की नाही हे चुकीचे आहे, मुस्लिमांनी त्यांना निवडून आणलेले नाही आहे.  
 
बुखारी यांनी आपल्या 19 वर्षाच्या मुलला (शाबान) आपले वारस म्हणून घोषित केले आहे. 22 नोव्हेंबर रोजी दस्तारबंदीची विधी करून त्याला नायब इमाम घोषित करण्यात येईल. याची चर्चा मिडियात सुरू आहे.   
 
अस ऐकण्यात आले आहे की दस्तारबंदीच्या विधीसाठी ज्या लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे त्यात गृहमंत्री राजनाथसिंह आणि  भाजप नेता शाहनवाज हुसेन यांचे नाव सामील आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गायब आहे.  
 
नवीन इमामच्या ताजपोशीच्या कार्यक्रमात स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि राज्यसभा संसद विजय गोयल यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी, अभिषेक मनू सिंघवी, एसपी मुखिया मुलायम सिंह यादव आणि सीएम अखिलेश यादव यांचेही नाव आहे.