मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

धर्मेंद्रची जमीन हडपण्याचा प्रयत्न

WD
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांची कोट्यावधी रुपयांची जमीन खोट्या दस्तावेजांद्वारे हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. दक्षता विभागाने याप्रकरणी 12 जणांविरुद्ध खटला दाखल करून 2 जणांना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध घेण्यासाठी सध्या धाडसत्र सुरू आहे. लुधियाना जिल्ह्यातील हैबोवाल भागातील 10 हजार चौरस फूट भूखंड आहे. हा भूखंड प्रॉपर्टी डीलर रोहित कपिला व जसवंत सिंग यांनी पटवारी व सचिवालयातील लोकांची मदत घेऊन हडपण्याचे प्रयत्न केले होते, अशी माहिती विशेष पोलिस अधीक्षक सतींदर सिंग यांनी दिली.