शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (13:09 IST)

नजमा हेपतुल्लांचे युटर्न हिंदू नव्हे हिंदी म्हटले होते

केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी युटर्न घेत आपण हिंदू नाही तर हिंदी असे म्हटले होते. 'हिंदू' या शब्दावरून केलेल्या टिप्पणीमुळे हेपतुल्ला अडचणीत सापडल्या होत्या. आपल्या वक्तव्याचा धर्माशी काहीही संबंध नसून, देशाची ओळख या दृष्टीने आपण हिंदी असा शब्द वापरल्याचा खुलासा त्यांनी केला.

दरम्यान, सर्व भारतीय हिंदी असल्याचे आपण म्हटले होते. भारतात राहणारे सर्व हिंदी अशी अरेबिक संज्ञा आहे. तेच आपल्याला अभिप्रेत होते. धर्माचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीयांना हिंदू म्हणून संबोधले पाहिजे, असे म्हटले होते.