मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:17 IST)

नयनतारांनी परत केला ‘साहित्य अकादमी’

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि सरकारचे दुर्लक्ष याचा निषेध म्हणून ज्येष्ठ लेखिका व जवाहरलाल नेहरू यांच्या पुतणी नयनतारा सहगल यांनी ‘साहित्य अकादमी’ परत केला.
 
‘रिच लाइक अस’ या इंग्रजी कादंबरीबद्दल सहगल यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सध्या देशातील विचारसरणी हुकूमशाही विचारसरणी आहे. असे हुकूमशाही सरकार कधीही नव्हते. मला जे योग्य वाटते तसे मी करीत आहे, असे सांगत सहगल यांनी ‘साहित्य अकादमी’ परत केला आहे.