शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (13:22 IST)

नरेंद्र मोदी जपान दौर्यावर रवाना, बुलेट ट्रेनसह आण्विक करारांची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी जपान दौर्याकसाठी रवाना झाले. मोदींचा जपान दौरा पाच दिवसांचा आहे. या दौर्यात दरम्यान बुलेट ट्रेन आणि आण्विक करारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी यापूर्वी भूटान, ब्राजील आणि नेपाळचा दौराकरून तेथील लोकांचे मने जिंकून घेतली होती.

नरेंद्र मोदी यांच्या या दौर्याकडून दोन्ही देशांच्या नागरिकांना खुप आशा आहेत. सर्वात पहिले पंतप्रधान जपानची आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाणारी क्योटो शहरात दुपारी दोन वाजता पोहोचणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे खुद हे मोदींचे स्वागत करतील. मोदींच्या या दौर्यासमुळे दोन देशांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

एक सप्टेंबर रोजी होणार्याम द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार असून काही महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेन आणि आण्विक करार या मुद्यावरही चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जपानच्या विख्यात तोजी मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या सोबत मोदी देखील सहभागी होणार आहेत.