शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी द‍िल्ली , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:18 IST)

नरेंद्र मोदी यांचा जनकपूर दौरा रद्द झाल्याने निदर्शने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित  जनकपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदी सार्क  अर्थात दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेत सहभागी  होण्यासाठी नेपाळ भेटीवर जाणार आहे. त्यामुळा  जनकपूर भेट रद्द करावी लागण्यात आल्याचे सांगण्यात  येते.
 
गेल्या ऑगस्टमध्ये मोदी काठमांडूत असताना त्यांनी पुढील  दौर्‍यात जनकपूर, लुंबिनी आणि मुक्तीनाथ येथे भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मोदी यांनी  जनकपूर भेट वेळापत्रकानुसार रद्द केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 
 
पंतप्रधान ठरल्याप्रमाणे काठमांडूला जाऊन सार्क शिखर  परिषदेत सहभागी होतील, असे परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी स्पष्‍ट केले आहे. 
 
वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या जनकपूरचे प्राचीन महत्त्व  आहे. सीतेचे जन्मस्थान म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. त्यामुळे हिंदु समुदायात हे अत्यंत पवित्र ठिकाण  मानले जाते . काठमांडूपासून 250 किलोमीटर अंतरावर जनकपूर आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ  असलेले लुंबिनीला देखील मोदी भेट देणार होते. तसेच दक्षिणेकड डोंगररांगेतील मुक्तीनाथ या हिंदु तीर्थक्षेत्रालाही  त्यांची भेट होती. दरम्यान मोदींच्या सभा रद्द झाल्याच्या  निषेधार्थ गावात निदर्शने करण्‍यात आली.