गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (14:12 IST)

नरेंद्र मोदींची उर्दू वेबसाईट लॉन्च

उर्दूमधून ट्विट करत मुसलमानांना आकर्षित  करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार   नरेंद्र मोदी यांची उर्दू वेबसाइट लॉन्च करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि प्रख्यात लेखक सलीम  खान यांच्या हस्ते वेबसाइड लॉन्च करण्‍यात आली. मोदींच्या  राज्यात मुसलमान सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्रही सलमानचे   वडील आणि लेखक सलीम खान यांनी दिले आहे. वेबसाईट  लाँच झाल्यानंतर सलीम खान पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी भाजपाच्या नेत्या शायना एन.सी.ही उपस्थित  होत्या. सलमान खानने पतंग महोत्सवामध्ये मोदींसमवेत  पतंग उडवून मोदी 'इज अ गुड मॅन' असे सांगताना  त्यांच्या नशीबात असेल त्या सर्व गोष्टी त्यांना मिळाव्यात  असे उद्‍गार काढले

http://www.narendramodi.in/lng/u rdu/ अशी मोदींच्या उर्दू भाषेतील वेबसाइटची लिंक आहे.  मोदींचा संपूर्ण जीवनआलेख, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून  त्यांची यशस्वी कारकिर्द अशा सर्व गोष्टींची माहिती या  वेबसाईटवर मांडण्यात आली आहे तसेच वेबसाईटच्या  होमपेजवर मोदींचे मुसलमानांसह फोटोही आहेत. आतापर्यंत 17भाषांमध्ये मोदींची वेबसाईट लॉन्च  करण्यात आली आहे.