शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 4 मार्च 2015 (14:14 IST)

नरेंद्र मोदींच्या भावाने केंद्राविरुध्द आवाज उठविला

सार्वजनिक वितरण प्रणालीतील म्हणजेच रेशन दुकानदारांच मागणंकडे दुर्लक्ष केलस उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभेच निवडणुकीत तचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
 
रेशन दुकानदार आपल विविध मागणंसाठी देशभर निदर्शने करीत आहेत. तंच मागणंचा विचार न केलस केंद्री अर्थसंकल्प अधिवेशन संपणचा आधी म्हणजे 17 मार्चला राजधानी दिल्लीत जंतरमंतर येथे निदर्शने करण्याची आणि रामलीला मैदानावर मेळावा आोजित करणची योजना आहे.
 
अखिल भारतीय रास्त भाव डिलर्स ङ्खेडरेशनचे उपाध्क्ष पल्र्हाद मोदी यांनी मुंबईत आझाद मैदानावर केंद्र सरकारच्या विरोधात झालेल्या एका आंदोलनात सहभाग घेतला होता. लोकसभा निवडणुकीत आमची संघटना भाजपच्या बाजूने होती. परंतु आमच्या मागणंकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याची किंमत मोजावी लागली, असेही प्रल्हाद मोदी म्हणाले. रेशन दुकानदारांची कमिशन वाढविण्याची प्रलंबित मागणी आहे. तसेच प्रत्येक रेशन दुकानदारांकडे कमीत कमी 1 हजार कार्डधारक असले पाहिजे, अशीही एक मागणी आहे.