शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 30 जून 2015 (11:13 IST)

नरेंद्र मोदींना सेल्फी पाठवू नका

‘सावधान! नरेंद्र मोदी यांच्या ‘सेल्फी विथ डॉटर’च्या आवाहनावर जाऊ नका. तुमच्या मुलींचे सेल्फी शेअर करताना काळजी घ्या. पोरींच्या मागे लागण्याचा या माणसाचा इतिहास आहे!’
 
अत्यंत कडवट व अश्लाघ्य शब्दांतील हे ट्विट केले आहे ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वूमन असोसिएशन’च्या सचिव व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कविता कृष्णन यांनी. ‘मोदी हे अक्षम आणि अयोग्य पंतप्रधान आहेत. पोरीबाळींच्या मागे लागण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या मुलीचे फोटो त्यांना पाठवताना काळजी घ्यावी,’ असे कृष्णन यांनी म्हटले आहे.
 
देशातील 100 जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष जन्मदरामधील दरी वाढत चालल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात चिंता व्यक्त केली होती. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी हरियाणातील एका सरपंचाने ‘सेल्फी विथ डॉटर’ ही मोहीम सुरू केल्याचा उल्लेख करून मोदी यांनी देशभरातील पित्यांनी कन्येसोबतचा सेल्फी मला पाठवावा. त्यातील चांगला सेल्फी मी रिट्विट करेन, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनावर प्रतिक्रिया देताना कृष्णन यांचा तोल गेला. ‘मन की बात’मध्ये रक्षाबंधनावर मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचाही कृष्णन यांनी समाचार घेतला आहे.