शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:42 IST)

नववर्षात बिहारमध्ये दारुबंदी

नितीशकुमार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले पहिले आश्वासन पुर्ण करीत बिहारमध्ये नववर्षांत १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. 
 
दारुनिषेध दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, १ एप्रिल २०१६पासून राज्यात दारूबंदी लागू करण्यात येणार असून, यासंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. राज्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येत आहे. दारूबंदी धोरण लागू केल्याने ४ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी होणार असून, त्याच्या भरपाईसाठी वेगळ्या उपाययोजना केल्या जातील, असेही नितीशकुमार म्हणाले. दरम्यान, या निर्णयामुळे गुजरात, केरळ, मणिपूर व नागालॅण्डनंतर दारूबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पाचवे राज्य ठरणार आहे.