मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पणजी , बुधवार, 25 मार्च 2015 (10:34 IST)

नौदलाचे विमान कोसळले; दोन बेपत्ता

गोव्याजवळ समुद्रामध्ये भारतीय नौदलाचे डॉर्नियर विमान कोसळले. प्रशिक्षण सुरु असाताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. या विमानाचा आज सकाळी नियमीत सराव सुरु होता. यावेळी विमानामध्ये तीन अधिकारी होते. कारवारपासून दहा मैल दूर हे विमान समुद्रात कोसळले. फ्लाइट कमांडर जोशी यांना मच्छिमारांनी वाचवले असून इतर दोन अधिकारी बेपत्ता आहेत.